भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच मूत्राचा वापर करून बंगल्यातील झाडांची चांगली जोपासना केल्याचे म्हटले होते, आता राज्याचे महसूल व कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनाही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे वाटणारी एक भन्नाट कल्पना सुचली आहे. मल्टिप्लेक्समधील मानवी मलमूत्राचा शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी वापर करता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या मूत्रमहात्म्यामुळे वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.
या संदर्भात खडसे यांच्याशी प्रयत्न करुनही संपर्क होऊ शकला नाही.