तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणलं असतं, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांना लक्ष्य केलं. मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला. कारण, गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“मी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला होता. माझ्यावर माझ्या घराण्याचे संस्कार किंवा शिकवण महत्वाची आहे. म्हणूनच मी राजीनामा दिला. आता माझ्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हात मिळवलात तेव्हा तुमची नैतिकता कुठल्या डब्यात…” फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदेंनी म्हणाले, “बहुमताच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. अपात्रतेचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. त्यामुळे अध्यक्ष बहुमतावर निर्णय घेतील. तसेच, माजी मुख्यमंत्र्यांनी बहुमत नसल्याने राजीनामा दिला. तेव्हा सरकार अल्पमतात आलं होतं.”

“आम्ही कायदेशीर आणि घटनात्मक बाबींची काळजी घेऊन सरकार स्थापन केलं आहे. पण, आता नैतिकतेच्या बाबी ज्या सुरू झाल्या आहेत. आम्ही हा निर्णय घेताना जनमत, जनभावना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेचा आदर केला आहे. शिवसेना आणि भाजपाने मिळून निवडून लढवली. मात्र, सत्ता आणि खुर्चीसाठी सरकार दुसऱ्यांबरोबर बनवण्यात आलं. म्हणून नैतिकता कोणी जपली, हे मला सांगण्याची आवश्यकता नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.

हेही वाचा : ठाकरे विरुद्ध शिंदे : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे लोक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना वाचवत काँग्रेस, राष्ट्रवादीकरण थांबवण्याचं काम आम्ही केलं. धनुष्यबाण गहाण ठेवलेला, वाचवण्याचं काम आम्ही केलं आहे. तसेच, व्हिप लागण्यासाठी तुमच्याकडं माणसं किती आहेत. हा देखील प्रश्न आहे,” अशी मिश्किल टिप्पणी एकनाथ शिंदेंनी केली आहे.