मी मुख्यमंत्री होण्यासाठी बंड केलं नाही. लोकांनी दिलेल्या कौलाप्रमाणे सरकार स्थापन झालं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न केला. पण, यश आम्हाला आलं नाही. बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आम्ही मतं मागितली. लोकं आमच्यासारखं बोलतं नाहीत. मतपेटीतून दाखवतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. ते ‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’मध्ये बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपा सत्तेसाठी कोणतीही तोडफोड करत नाही. राज्याचा विकास होऊन चांगले दिवस आले पाहिजेत. ही भूमिका ठेवून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री पद मला देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका मोठी आहे. तसेच, सरकार बदलल्याने केंद्राने २ लाख कोटी रुपये दिले. अन्य प्रकल्पांनाही केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. आम्ही हेच सांगत होतो. अडीच वर्षे पुढं गेलो असतो, मागे नाही,” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

हेही वाचा : “गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यपाल खासगीत…”, कोश्यारींच्या पदमुक्तीच्या इच्छेवर देवेंद्र फडणवसींची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंच्या सरकारमधील कोणत्या मिस करताय? असा सवाल एकनाथ शिंदेंना विचारला. यावर एकनाथ शिंदे अशोक चव्हाण यांच्याकडे पाहून म्हणाले, “सांगू का इथे. नाव घेतली तर त्यांची अडचण होईल ना. सांगायचं नसतं. गुपचूप कार्यक्रम करायचं असतो. तसेच, महाविकास आघाडीच्या सरकारच्या कॅबिनेटमध्ये कसे निर्णय व्हायचे. याचे साक्षीदार अशोक चव्हाण आहेत,” असेही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde who miss uddhav thackeray mahavikas government minister ssa
First published on: 24-01-2023 at 13:50 IST