मुंबई : भरधाव वेगाने धावणाऱ्या एका मोटारसायकलने धडक दिल्याने रस्त्यावरून पायी जाणाऱ्या ८४ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळी वांद्रे येथे हा अपघात झाला.

वांद्रे पश्चिम परिसरातील मडमवाडी येथे वास्तव्यास असलेले अब्दुल करीम मोहम्मद मोमीन (८४) मंगळवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास वांद्रे येथील सुन्नी जामा मशिद येथे नमाज पढण्यासाठी जात होते. रियाज रेस्टॉरंट समोरील रस्त्यावरून पायी जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या एका मोटारसायकलने त्यांना धडक दिली. या धडकेत अब्दुल मोमीन गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आले. रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्ररकणी वांद्रे पोलीस ठाण्यात मोटारसायकलस्वार अराफत मोह्ममद समीर शेख (१९) विरोधात मोटार वाहन अधिनियम १८४, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) आणि २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.