मुंबई : सांताक्रूझ येथील एका सात मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.

हेही वाचा – VIDEO: गोष्ट मुंबईची: भाग ११९ – ‘या’ ठिकाणी होती मुंबईतील सर्वात प्राचीन नागरवस्ती!

Fire at Phoenix Mall on Nagar Street pune
पुणे : नगर रस्त्यावर फिनिक्स मॉलमध्ये आग
Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी

सांताक्रझ पूर्व येथील ‘ट्राईड ऑफ कलिना’ या सात मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शुक्रवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. या आगीत नागीन लाखू पटेल (८५) गंभीररित्या जखमी झाले. तात्काळ त्यांना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात त्यांना मृत घोषित केले.