scorecardresearch

Premium

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चार नवीन पोलीस ठाणी

प्रवाशांची वाढती संख्या लक्षा घेता आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस चार नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव सध्या गृहविभागात अंतिम टप्प्यात आहे.

Four new police stations safety railway passengers mumbai
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी चार नवीन पोलीस ठाणी (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे चार नवीन रेल्वे पोलीस ठाणी स्थापन करण्याचे नियोजन असून त्यासाठी सुमारे ९०० अतिरिक्त पोलिसांची आवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात आहे.

NMMT Bus Service Stopped in Uran
उरणमधील एनएमएमटी बससेवा बंद
vistadome trains marathi news, vistadome coaches marathi news, passengers giving preference to vistadome trains marathi news
प्रवाशांना खुणावतोय ‘व्हिस्टाडोम’, प्रवासादरम्यान आनंद घ्या निसर्ग सौंदर्य अन् नयनरम्य दृश्यांचा!
15 coaches slow local will run between churchgate to virar
चर्चगेट- विरारदरम्यान १५ डब्यांची धीमी लोकल धावणार
The Pune Division of the Central Railway intensified the action against the passengers pune
फुकट्या प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई तीव्र! दररोज लाखोंची वसूली…

मुंबई महानगराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज सुमारे ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई रेल्वे पोलीस ठाण्यांचा विचार केल्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुंबईतील विविध रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १० हजार ३६१ गुन्हे दाखल झाले आहेत. लोकलच्या तिन्ही मार्गांवर एकूण १७ रेल्वे पोलीस ठाणी असून या पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे चार हजार अधिकारी – पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षा घेता आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस चार नवीन पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव सध्या गृहविभागात अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा… मुलुंडमधील एम टी अगरवाल सुपर स्पेशालिटी रुग्णालय नववर्षात रुग्णांच्या सेवेत; १२ लाखांपेक्षा अधिक रुग्णांना होणार लाभ

मध्य रेल्वे मार्गावर कल्याण रेल्वे स्थानकानंतर थेट कसारा रेल्वे पोलीस ठाणे आहे. या दोन रेल्वे पोलीस ठाण्यांमधील अंतर ६७ किलोमीटर असून त्यादरम्यान सुमारे १२ स्थानकांचा समावेश आहे. दुसरीकडे कर्जत मार्गावर कल्याणनंतर थेट कर्जत रेल्वे पोलीस ठाणे आहे. त्या दोन स्थानकांमधील अंतर सुमारे ४६ किलोमीटर आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण जंक्शनवर प्रमुख एक्स्प्रेस आणि लोकल थांबतात. शहाड, आंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, खर्डी येथे मोठया संख्येने वसाहती आहेत. तेथून मुंबईत येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहाड ते खर्डीदरम्यान काही घटना घडल्यास तक्रारदारांना तक्रार करण्यासाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात जावे लागते. तसेच उल्हासनगर, अंबरनाथ, नेरळ, भिवपुरी येथे लोकवस्त्या वाढत असून तेथून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईत येतात.

हेही वाचा… शीवमध्ये चारचाकी गाडीचा पहाटे अपघात, दोन ठार, तीन जखमी; दुभाजकाला धडकल्यामुळे गाडीने पेट घेतला

पश्चिम मार्गावरील प्रवशांची सख्या वाढत असल्यामुळे बोरिवली व वसई दरम्यानही एका रेल्वे स्थानकाची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. बोरिवली रेल्वेची हद्द जोगेश्वरी – दहिसर, वसई रेल्वे पोलिसांची हद्द मीरा रोड – विरारपर्यंत आहे. भाईंदर येथील नवीन पोलीस ठाण्यामुळे वसई रेल्वे भार हलका होणार आहे. तसेच मुंबईतील कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवरील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येथून दररोज सुमारे ६० लांबपल्ल्याच्या रेल्वे सुटतात.

हेही वाचा… मुंबई गोवा महामार्ग खरंच सुधारणार? रवींद्र चव्हाणांचा पाचवा दौरा!

एलटीटीमध्ये सध्या दररोज दीड लाखाहून अधिक प्रवासी येतात. एलटीटी स्थानक सध्या कुर्ला रेल्वे पोलिसांच्या हद्दीत येते. पण कुर्ला रेल्वे पोलिसांची हद्द व वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता एलटीटीमध्येही स्वतंत्र रेल्वे पोलीस ठाणे सुरू करावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत गोवंडी, मानखुर्द आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते गोरेगाव स्थानकांमधील स्थानकांचा समावेश करता येतील. त्यामुळे कुर्ला रेल्वे पोलिसांचा बराचसा भार हलका होईल. त्यासाठी रेल्वे पोलिसांना सुमारे ९०० अतिरिक्त पोलिसांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव रेल्वे पोलिसांकडून राज्य पोलिसांकडे व तेथून पुढे गृहविभागाकडे पाठवण्यात आला होता. पोलीस ठाण्यांमुळे रेल्वे पोलिसांचे संख्याबळ वाढणार असल्यामुळे अर्थ नियोजनाच्या दृष्टीने प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four new police stations for the safety of railway passengers in mumbai print news dvr

First published on: 11-09-2023 at 15:45 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×