१९७०-८० च्या दशकात मराठी माणूस आपल्या हक्कांसाठी आणि अस्तित्वासाठी झगडत होता. मराठी माणूस फक्त नोकरी करणार, त्याला काही व्यवसाय जमणार नाही, असा त्या काळचा समज होता. परंतु डोंबिवलीच्या कानिटकरांनी मात्र हा समज मोडून काढला. त्यांनी १९७८ साली भारतातील पहिले पोळीभाजी केंद्र उभारले आणि ते यशस्वीरित्या चालवूनही दाखवले. बघता बघता कानिटकरांचे हे पोळीभाजी केंद्र डोंबिवलीची ओळख बनले. पोळीभाजी केंद्रापासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास आता लाडवांच्या व्यवसायापर्यंत येऊन पोहोचला आहे. जाणून घेऊया कानिटकरांच्या ४० वर्षाच्या प्रवासाविषयी…

Video : संकेत म्हात्रे – आवाजाच्या दुनियेतील मराठमोळं नाव । गोष्ट असामान्यांची – भाग १२

आज राज्यात ठिकठिकाणी अनेक पोळीभाजी केंद्र आहेत. कित्येक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर होत आहे. घरगुती जेवणाला पर्याय म्हणजे महाराष्ट्रातील कित्येक पोळीभाजी केंद्र. आजच्या घडीला कानिटकरांची ३ पोळीभाजी केंद्रे आणि फक्त लाडू विक्रीची ४ दुकाने आहेत. आपल्या पारंपरिक लाडूंना ब्रँड बनवण्याचं स्वप्न कानिटकरांनी पाहिलं आहे आणि त्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गोष्ट असामान्यांची’ या मालिकेतील इतर एपिसोड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.