Gang arrested for cheating Rs 25 lakhs by pretending to triple the money mumbai | Loksatta

पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

ठाणे परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराची काही दिवसांपूर्वी या टोळीतील एका आरोपीसोबत ओळख झाली होती. तक्रारदाराकडून २५ लाख रुपये घेऊन त्याला ७५ लाखांच्या बनावट नोटा देण्याचे अमिष आरोपीने दाखविले होते.

पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करणारी टोळी अटकेत
प्रातिनिधिक छायाचित्र

पैसे तिप्पट करण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीतील सहा जणांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे पावणेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा- मुंबई : कांदिवलीमध्ये घरफोडी; १४ लाखांचा मुद्देमाल लूटला

ठाणे परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराची काही दिवसांपूर्वी या टोळीतील एका आरोपीसोबत ओळख झाली होती. तक्रारदाराकडून २५ लाख रुपये घेऊन त्याला ७५ लाखांच्या बनावट नोटा देण्याचे अमिष आरोपीने दाखविले होते. तक्रारदार २५ नोव्हेंबर रोजी २५ लाख रुपये घेऊन घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालय परिसरात पोहोचला होता. आरोपींनी तक्रारदारकडून २५ लाख रुपयांची बॅग घेतली आणि पोलीस आल्याचा बहाणा करून २५ लाख रुपयांसह पोबारा केला.

हेही वाचा- मुंबई: विलेपार्ले स्टुडिओ घोटाळ्यात अखेर महापालिकेची कारवाई

याप्रकरणी तक्रारदाराने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या माध्यमातून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा ताब्यात घेतली. त्यानंतर पोलिसांनी अर्षद खान (३२), अल्ताफ खान (२५), अकबर शेख (५०), नईम शेख (४३), इम्तियाज खान (३२) आणि रवींद्र खंडागळे (५२) या सहा जणांना घाटकोपर येथून अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून रोख पाच लाख २३ हजार रुपये, एक रिक्षा आणि दोन दुचाकी असा एकूण सहा लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अन्य एका आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 20:23 IST
Next Story
“दीपाली सय्यद यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावली”, माजी स्वीय्य सहाय्यकाचे गंभीर आरोप; राज्यपालांवर