मुंबई :ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त मंगळवार, २ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी असेल. तसा शासन निर्णय ७ ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेला आहे.

वर्ष २०२५ मधील सुट्ट्यांचे वेळापत्रक १८ डीसेंबर २०२४ रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये १६ ऑगस्ट रोजी दहिहंडी आणि ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीनिमित्त स्थानिक सुट्टी देण्यात आली होती. या दोन्ही सुट्ट्या शनिवारी येत असल्याने त्यात बदल करण्यात आला आहे.

नव्या बदलानुसार १६ ऑगस्ट दहिहंडीची सुट्टी ८ ऑगस्ट नारळी पौर्णिमेला देण्यात आली. ६ सप्टेंबर अनंत चतुर्थशीची सुट्टी २ सप्टेंबर रोजी ज्येष्ठगौरी विसर्जन अशी देण्यात आलेली आहे. हा बदल मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू आहे. बँका व केेंद्र सरकारची कार्यालये सुरू असतील.