मुंबई : घरच्यांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणीने वडील, काका आणि आजोबांवर चाकूने हल्ला केला. य हल्लात वडील आणि आजोबांचा मृत्यू झाला, तर काका गंभीर जखमी झाले. हत्येनंतर चाकू घेऊन हा तरूण पोलीस ठाण्यात हजर झाला. अंधेरीत मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.

आरोपी चेतन भत्रे (२३) अंधेरी (पूर्व) येथील संतोषी माता चाळीत रहातो. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. बुधवारी पहाटे १ च्या सुमारास भत्रे रक्ताने माखलेला चाकू घेऊन पोलीस चौकीत हजर झाला. वडील, काका आणि आजोबांवर प्राणघातक हल्ला केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

सततत्या छळामुळे केली हत्या

वडील मनोज भत्रे (५७), आजोबा बाबू भत्रे (७९) आणि काका अनिल भत्रे (५४) आपला लहानपणापासून सतत छळत होते. या त्रासाला कंटाळून त्याच्या आईलाही घर सोडावे लागले होते. दरम्यान, वडील, आजोबा आणि काका हे कायम दारू पिऊन त्रास देत होते. आपला आणि बहिणीचा पगार हिसकावून घेत होते. पैसे न दिल्यास वारंवार घरात भांडण करीत होते, असे चेतनने पोलिसांना सांगितले.

मंगळवारी झालेल्या भांडण्यामुळे सहनशक्ती संपली

मंगळवारी रात्री ११ वाजता कामावरून परतल्यानंतर वडिलांनी पैशांसाठी भांडण सुरू केले. आजोबा आणि काकाही त्यांना साथ देत होते. त्यामुळे संतापलेल्या चेतनने स्वयंपाकघरातील सुऱ्याने तिघांवर हल्ला केला. प्रथम वडिलांचा गळा चिरला, त्यानंतर आजोबा आणि काकांवर वार केले. यात वडील आणि आजोबा जागीच ठार झाले, तर काकांच्या हनुवटीवर गंभीर जखम झाली. स्थानिकांनी तातडीने काकांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना नायर रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हत्येचा गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र वाणी यांनी सांगितले की, चेतन भत्रेवर हत्या, तसेच शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, मनोज आणि बाबू यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.