मुंबई : महापालिकेतील घनकचरा विभागाच्या उपायुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. घनकचरा विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांना पदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्याकडे शिक्षण विभाग सोपवण्यात आला आहे. उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्याकडे घनकचरा विभागाची सूत्रे देण्यात आली आहेत.

मुंबई महापालिकेचा घनकचरा विभाग सध्या चर्चेत आहे. प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेवर मुख्यमंत्री शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे पालिकेचा घनकचरा विभाग कामाला लागला आहे. त्यातच गेल्या आठवड्यात कामात कुचराई केल्याबद्दल एका उपमुख्य अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसांनी घनकचरा विभागाच्या उपयुक्तांचीच बदली करण्यात आली आहे.

आणखी वाचा-मुंबईतील कांदळवनांची भरपाई गडचिरोलीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहआयुक्त डी. गंगाधरन यांच्याकडे दक्षता व शिक्षण असे दोन पदभार होते. त्यापैकी शिक्षण विभाग आता चंदा जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अतिक्रमण निर्मूलन आणि मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाची जबाबदारी असलेले उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे घनकचरा विभागाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.