लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे. पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

जुलै महिन्यात अनेक दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून राज्यात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे शहरांत पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आणखी वाचा-स्पायनल मस्कूलर ॲट्रोफीग्रस्त रुग्णांना नायर रुग्णालयाचा दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेसेवा विस्कळीत

कल्याण भागात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडत असल्याने कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी दुपारी २.४० वाजता पॉईंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. या घटनेमुळे कल्याण – कसारा दिशेला जाणारी लोकल सेवा ठप्प झाली. पुढील सूचनेपर्यंत ही सेवा ठप्प असेल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.