मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयातील वॉर रूमच्या महासंचालकपदाचा राजीनामा देणारे सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार हे लवकरच राजकारणात सक्रिय होणार आहेत.  लोकसभा निवडणूक भाजपकडून लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. मोपलवार यांच्या कार्यकाळातील कारभाराची चौकशी करण्याची मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

मोपलवार यांना गेल्याच महिन्यात महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून दूर करण्यात आले होते. पाठोपाठ मुख्यमंत्री कार्यालयातील वॉर रूमचे महासंचालक या पदाचा त्यांनी राजीनामा दिला. मोपलवार हे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. तसे संकेत त्यांनी दिले आहेत. मोपलवार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भात त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे.  मोपलवार हिंगोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे मोपलवार यांनी सांगितले.

palghar lok sabha election 2024, bahujan vikas aghadi palghar marathi news
पालघरमध्ये ठाकूरांचा उमेदवार महायुतीच्या विरोधात रिंगणात
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
prashant kishor
“…तर राहुल गांधींनी राजकारणातून बाजूला व्हावं”, प्रशांत किशोर यांचा सल्ला
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

हेही वाचा >>> काँग्रेसचा २७ जागांवर दावा; पक्षाच्या केंद्रीय समितीकडे प्रस्ताव सादर

मनमानी पद्धतीने कंत्राटे-शर्मा

मोपलवार यांची चौकशी करण्याची मागणी आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा- मेनन यांनी केली. ‘समृद्धी’ प्रकल्पातले घोटाळे बाहेर येऊ लागले होते, म्हणून मोपलवार यांनी  वॉर रूम प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मोपलवार यांनी समृद्धी प्रकल्पात मनमानी पद्धतीने कंत्राटे दिली होती. बहुतांश त्यांच्या नातेवाईकांना दिली होती, असा दावा त्यांनी केला.

राजकारणात सक्रिय झालेले अधिकारी

राज्याच्या सेवेतील अनेक अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर किंवा लवकर निवृत्ती स्वीकारून राजकारणात प्रवेश केला आहे. यात टी. चंद्रशेखर, माजी गृहनिर्माण सचिव रामाराव, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक व सत्यापाल सिंह, अरुण भाटिया, संभाजी झेंडे, प्रताप दिघावकर, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी खासदार हरिभाऊ राठोड, आमदार शामसुंदर शिंदे, माजी आमदार अहिरे, खासदार राजेंद्र गावित आदींचा समावेश आहे. या यादीत मोपलवार यांची भर पडणार आहे.