मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकणवासीयांनी गावची वाट धरली असून रेल्वे गाड्यांना कोकणवासियांची गर्दी होऊ लागली आहे. गर्दीचे विभाजन करण्यासाठी मध्य रेल्वेने दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढविली आहे. दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसला शुक्रवारपासून तृतीय श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : ईडीचे मुंबईसह देशभरात ३९ ठिकाणी छापे; ४१७ कोटींची मालमत्ता जप्त, सेलिब्रिटींनीही हवालामार्फत पैसे स्वीकारले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी क्रमांक १०१०५ दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसला १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत आणि गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्स्प्रेसला १५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरपर्यंत तृतीय श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात येणार आहेत. यासह १० सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार डबा असणार आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.