मुंबई : पायधुनीमध्ये एका व्यावसायिकाला स्वस्तात सोन्याची बिस्किटे देण्याच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक करण्यात आल्याची घडली आहे. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला असून दलाली करणाऱ्या तेजस राजेंद्र पारिख (४२) आणि टॅक्सी चालक इफ्तेकार आशिकअली आजम (४०) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा : सर्व स्पोर्ट्स क्लब आणि जिमखान्यांच्या भाडेदरात सवलत हवी, ॲड मकरंद नार्वेकर यांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबादेवी परिसरात राहणारे व्यावसायिक तौसीफ हबीबुल रेहमान सय्यद (३४) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पारीख हा गिरगाव तर आजम हा शिवडीचा रहिवासी आहे. सय्यद यांच्या तक्रारीनुसार, आजम आणि पारीख यांनी त्याच्या मुंबादेवी येथील कार्यालयात बोलावून कमी भावात सोन्याची बिस्किटे देतो असे सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून होकार दिला. ठरल्याप्रमाणे सय्यद यांनी आरोपीना एक कोटी रुपयांची रोकड दिली. मात्र पैसे देऊनही सोन्याची बिस्किटे हाती न लागल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पैसे परत करण्याबाबत तगादा लावला. मात्र पैसे देण्यासही टाळाटाळ सुरु झाल्याने सय्यद यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.