मुंबई : अंधेरी – कुर्ला मार्गावरील साकीनाका परिसरातील एक मजली गोदामाला सकाळी ९ च्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये १५ हजार चौरस फुटावरील जागेतील लाकडी सामान, कपडे, यंत्रसामग्री, कागदाचे गठ्ठे जळून खाक झाले. सकाळी लागलेली ही आग विझवण्याचे काम अद्याप सुरू आहे. साकीनाका परिसरात जरीमरी बस स्टॉप परिसरात नेक्सस सिनेमाच्या समोर असलेल्या दोन गाळ्यांना सकाळी ९च्या सुमारास अचानक आग लागली.

हेही वाचा : मुंबई : मोटरमनच्या ३० टक्के जागा रिक्त

mumbai nashik highway, traffic route changes
मुंबई नाशिक महामार्गावर उद्या मोठे वाहतूक बदल
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद

एक मजली बांधकाम असलेल्या या गोदामात विविध प्रकारचे लाकडी सामान ठेवले होते. या आगीमध्ये विद्युत वाहिन्या, विद्युत यंत्रणा, कागदाचे गठ्ठे, यंत्रसामग्री, कपड्यांचे गठ्ठे, शिलाई यंत्र, लाकडी दरवाजे, खिडक्यांचे सामान, फर्निचर आदी जळून खाक झाले. तब्बल १५ हजार चौरस फूट जागेतील दोन गाळे या आगीत भस्मसात झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम अद्याप सुरूआहे.