मुंबई : लहान बाळांमध्ये जन्मत: असलेला बहिरेपणा वेळेत लक्षात आल्यास त्यावर योग्य उपचार करून व्यंग दूर करणे शक्य असते. याअनुषंगाने जे.जे. रुग्णालयात १८ मार्च रोजी ३०० जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३५ जणांना उपचाराची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बोलविण्यात आले.

नवजात एक हजारपैकी चार-पाच बालकांमध्ये श्रवणशक्ती कमी असते. तसेच लहान मुलांच्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल होणाऱ्या नवजात बालकांमध्ये हे प्रमाण अधिक असते. भाषा विकासाचा सर्वात महत्त्वाचा कालावधी म्हणजे आयुष्याची पहिली दोन वर्षे असतात. बाळाची ऐकण्याची क्षमता कमी असेल तर त्याच्या वाचा विकासाच्या प्रक्रियेला विलंब होतो. श्रवण प्रणाली सामान्यपणे विकसित होण्यासाठी श्रवण प्रणालीला उत्तेजन देणे आवश्यक आहे. बालकांमधील श्रवण क्षमता तपासणीचा सर्वोत्तम वेळ हा बाळ जन्मल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये असतो. तर तिसऱ्या महिन्यांपूर्वी त्यावर उपचार सुरू केल्यास श्रवण क्षमता विकसित करण्यास फायदेशीर ठरते.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

हेही वाचा : मुंबई : रेल्वे स्थानकांतील थ्रीडी सेल्फी बूथ, पॉइंट्स हटवले; रेल्वे स्थानकांनी घेतला मोकळा श्वास

श्रवण क्षमता तपासणीसाठी ‘ओएई’ ही तपासणी केली जाते. या तपासणीत जन्माच्या वेळी असलेले दोष, श्रवण रोग, श्रवण कमतरता आणि श्रवण विकास विलंब होण्याची कारणे समजण्यास मदत होते. नवजात बालकांची जन्मल्यानंतर ‘ओएई’ तपासणी केल्यास त्यांच्यातील बहिरेपणा ओळखणे सोपे होते. त्यामुळे जन्म झाल्यानंतर २४ तासांनी नवजात बाळाची श्रवण तपासणी करणे आवश्यक असते. मात्र अनेक पालकांमध्ये याबाबत जागरुकता नसल्याने या चाचणीकडे दुर्लक्ष केले जाते. या पार्श्वभूमीवर जे.जे. रुग्णालयामध्ये जागतिक श्रवण दिनाच्या अनुषंगाने १८ मार्च रोजी ४ ते १८ वयाेगटातील ३०० जणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ३२ बालकांच्या श्रवण क्षमतेमध्ये काही त्रुटी असल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी पुन्हा बाेलविण्यात आले. तसेच बाळाच्या जन्म झाल्यानंतर २४ तासांनी नवजात बाळाची श्रवण तपासणी करणे आवश्यक असल्याचे जे.जे. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख डॉ. बेला वर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा : मुंबई : दागिने चोरीप्रकरणातील आरोपीला राजस्थानमधून अटक

या कार्यक्रमाला जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. बेला वर्मा, डॉ. विलास कुरुडे, आयएपी मुंबई शाखेचे अध्यक्ष डॉ. नेहल शाह, विशेष अतिथी परिजाद कोलाह मार्शल, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुशांत माने, व्हीकॉनेक्ट फाउंडेशनच्या नवाज मास्टर, डॉ. फातेमा जगमग आदी उपस्थित होते.