मुंबई : भारतीय रेल्वेमधील विविध विभागांत केंद्राच्या अनेक योजनांची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी बूथ’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी पाॅइंट्स’ उभारले होते. मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील महत्त्वाच्या ५० स्थानकांत थ्रीडी सेल्फी बूथ आणि पाॅइंट्स उभे केले होते. त्यासाठी १.६२ कोटी रुपयांचा खर्च केला होता. लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा आणि पुतळा असलेले थ्रीडी सेल्फी बूथ आणि पाॅइंट्स हटवले आहेत. तसेच रेल्वे स्थानकांवरील अडवलेली जागा रिकामी झाल्याने स्थानकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

स्किल इंडिया, डिजिटल इंडिया हम हैं डिजिटल, हम है नया भारत, स्पेस पॉवर नया भारत, नया भारत (घर) आवास की शक्ति, गॅस धुएं से मुक्ती -उज्वला की शक्ती, हर घर जल-जल जीवन मिशन, डिजिटल इंडिया हम है डिजिटल अशा केंद्र सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी, मध्य रेल्वेच्या स्थानकावर ‘थ्रीडी सेल्फी बूथ’ आणि ‘थ्रीडी सेल्फी पाॅइंट्स’ उभारले होते. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या पाच विभागाच्या प्रत्येकी दहा स्थानकांत हे बूथ आणि पॉइंट्स उभारले आहेत.

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Mumbai Municipal Corporation, bmc, Railway Officials, Conduct Joint Inspection, railway and bmc Joint Inspection, Prevent Monsoon Waterlogging, waterloggig on train track, waterlogging on mumbai road,
रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून खबरदारी, पश्चिम, मध्य रेल्वे स्थानकांवर महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त पाहणी
sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त

हेही वाचा : आचारसंहिता लागल्यामुळे पालकमंत्र्यांच्या पालिकेतील हस्तक्षेपावरही मर्यादा

पन्नास रेल्वे स्थानकांमधील ३० स्थानकांत तात्पुरत्या स्वरुपात आणि २० स्थानकांत कायमस्वरूपी बूथ आणि पाॅइंट्स उभारले होते. तात्पुरत्या स्वरुपाच्या एका सेल्फी पॉइंटसाठी तब्बल १.२५ लाख रुपये मोजले होते. कायमस्वरूपी एक सेल्फी पाॅइंट उभारण्यासाठी ६.२५ लाख रुपये खर्च केला होता. तात्पुरत्या स्वरूपातील बूथ आणि पॉइंट्स हटवले होते. तसेच आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे २० स्थानकांतील कायमस्वरूपी बूथ आणि पॉइंट्स हटवले आहेत.

हेही वाचा : महालक्ष्मी रेसकोर्स आणि विलिंग्डन क्लबसाठी ५० आजीव सदस्य नामनिर्देशित करण्याचा निर्णय रद्द करा

बूथ आणि पाॅइंट्समुळे एका रेल्वे अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

मध्य रेल्वे विभागात उभारण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी बूथ’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘थ्रीडी सेल्फी पाॅइंट्स’ खर्चाची रक्कम माहिती अधिकाराअंतर्गत प्रदान करण्यात आली. या माहितीच्या आधारे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारविरोधात समाज माध्यमावर निषेध व्यक्त केला होता. सर्वसामान्य भारतीयांचा कष्टाचा पैसा जाहिरातबाजीवर उडवण्यात येत असल्याची टिप्पणी केली होती. त्यामुळे ही माहिती देणाऱ्या वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केली होती.