मुंबई : गिरगाव चौपाटी येथे विसर्जन पाहण्याससाठी गुरुवारी थायलंडवरून काही मुंबईत दाखल झाले आहेत. गणरायावर असलेली श्रध्दा अनंत चतुर्दशी दिवशी मुंबईत असणारा जल्लोष पाहण्यासाठी ही मंडळी मुंबईत आली आहेत. थायलंडमध्ये मुख्यत्वे बौद्ध धर्माचे पालन केले जाते. मात्र, तेथे गणेशभक्तांची संख्यादेखील प्रचंड आहे. दरवर्षी थायलंड देशात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मनोभावे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून मोठ्या श्रद्धेने गणरायाची पूजा केली जाते.

हेही वाचा : “केम छो वरळी होर्डिंग लावणाऱ्यांमुळेच…”, मुंबईत मराठी महिलेला घर नाकारण्यावरून मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला!

Ayodhya Ram Mandir Tourism
विश्लेषण: अयोध्येचे राम मंदिर ठरले ‘गेम चेंजर’, भाविकांमध्ये ५०० पटींनी वाढ; का वाजतोय धार्मिक पर्यटनाचा देशभरात डंका?
येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण

यंदा थायलंडमधील काही भाविकांनी गणेश विसर्जनासाठी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गुरुवारी थायलंडमधील गणेशभक्त मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आले. इतकेच नव्हे, तर मुंबईत विसर्जन करण्यासाठी त्यांनी चक्क थायलंडमधून गणेशमूर्ती मुंबईत आणली होती. थायलंडवरून मुंबईत आलेल्या या गणेशभक्तांनी मुंबईतील गणेश मिरवणुकींचा आनंद लुटला आणि आणलेल्या गणेश मूर्तीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन केले. थायलंडवरून गणेश विसर्जनसाठी मुंबईत येण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.