मुंबई : अंधेरीमधील ओशिवरा मेट्रो स्थानकाजवळ एका महाविद्यालयीन तरूणीचा अज्ञात दुचाकीस्वाराने विनयभंग केला. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.

पीडित तरुणी २१ वर्षांची असून ओशिवरा परिसरात राहते. ती मंगळवार, ८ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता डी. एन,. नगर येथे मैत्रीणीबरोबर जेवणासाठी जाणार होती. त्यासाठी ती मेट्रो ट्रेन पकडण्यासाठी ओशिवरा मेट्रो स्थानकाजवळ पायी जात होती. त्यावेळी एक अज्ञात दुचाकीस्वार तिच्याजवळ आला. त्याने तिच्याजवळ येऊन गाडी थांबवली. तिला काही समजण्याच्या आतच त्याने तिचा विनयभंग केला. ती तरुणी सावरण्याच्या आत तो दुचाकी सुरू करून पळून गेला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेमुळे घाबरलेली तरुणी घरी परत गेली. तिने पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दखल केला आहे. परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या आधारे पोलीस या दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत. मुंबई महिलांसाठी सुरक्षित मानली जाते. मात्र संध्याकाळी रस्त्यात घडलेल्या या विनयभंगाच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेतितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोपीला लवकरच पकडले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.