मुंबई : बदलत्या काळानुसार करिअरच्या संधींचा भविष्यवेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे यंदाही आयोजन करण्यात आले आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाने या कार्यशाळेला आजपासून सुरुवात होणार आहे. दहावी – बारावीच्या शैक्षणिक टप्प्यानंतर विविध अभ्यासक्रम व नव्या क्षेत्रांची ओळख करून घेण्याची संधी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर मार्गदर्शन कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. माटुंगा (प.) येथील दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या २५ व २६ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

दहावी – बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर करिअरच्या संधींचा भविष्यवेध घेऊन अभ्यासक्रमाची निवड कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रम असतो. तसेच, या दरम्यान विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षा देण्याचेही वेध लागलेले असतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नियोजनबद्ध अभ्यास, संयम, शिस्त, आरोग्याची काळजी आणि वेळेचे गणित कसे जुळवावे, याबाबत तेजस्वी सातपुते आज (२५ मे) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच स्वत:चा प्रवास मांडत विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहेत.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Diwya tanwar success story
गरिबीवर मात करून स्वतःच्या हिमतीवर बनली भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी! कोण आहे जाणून घ्या…
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Vasai, fake police, keychain,
वसई : एका कीचेनमुळे फुटले नकली पोलिसाचे बिंग
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

तेजस्वी सातपुते या २०१२ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. नोव्हेंबरमध्ये मुख्य परीक्षा आणि मार्चमध्ये मुलाखत होऊन मे २०१२ मध्ये तेजस्वी सातपुते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षे प्रशिक्षण घेऊन २०१४ पासून पोलीस खात्यात रुजू झाल्या. प्रथम परतूर येथे सहायक पोलीस अधीक्षक झाल्या. नंतर सीआयडीमध्ये, पुण्यात उपायुक्त (वाहतूक नियंत्रण), साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक, सध्या त्या मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. तेजस्वी यांना २०२३ च्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पश्चिम उपनगरांतील काही भागात २७, २८ मे रोजी पाणीपुरवठा बंद

बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात विविध क्षेत्रांतील स्पर्धा कमालीची वाढली आहे. या काळात विद्यार्थी व पालकांमधील संवादही महत्त्वाचा ठरतो. या ताणतणावाचे नियोजन कसे करावे आणि विद्यार्थी व पालकांचे नाते घट्ट होऊन कसा मनमोकळा संवाद झाला पाहिजे, याबाबत २५ मे रोजी डॉ. हरीश शेट्टी व २६ मे रोजी डॉ. राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करणार आहेत. सध्या विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींमध्ये आमूलाग्र बदल घडून स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेतील ‘नव्या वाटा’ या सत्राअंतर्गत यूट्यूब – समाजमाध्यमे या विषयावर सुकीर्त गुमास्ते, वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी आणि एआय – कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत डॉ. भूषण केळकर मार्गदर्शन करतील. नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींची ओळख विवेक वेलणकर करून देणार आहेत. कौशल्य विकास आणि त्यामधील विविध संधींबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर मार्गदर्शन करतील. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत बख्तावर कृष्णन संवाद साधतील.

उद्या आयएएस अधिकारी मनुज जिंदल यांचे मार्गदर्शन

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, नेमका किती आणि कसा अभ्यास करणे आवश्यक आहे. विविध क्षेत्रांसह दैनंदिन घडामोडींची माहिती कशी जाणून घ्यायची, दिवसभरातील वेळेचे गणित कसे जुळवून आणायचे, शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक आरोग्य कसे जपावे, ताण कसा हाताळायचा, स्वत:ची पडताळणी करून आत्मविश्वास कसा ठेवायचा आदी विविध गोष्टींबाबत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत उद्या, २६ मे रोजी आयएएस अधिकारी मनुज जिंदल हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मनुज जिंदल हे २०१७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी गडचिरोली येथील भामरागड येथे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) आणि परिविक्षाधीन अधिकारी (पीओ), जालना येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या

२५ मे : http:// tiny. cc/ LSMargYashacha25 May २६ मे : http:// tiny. cc/ LSMargYashacha26 May

लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रवेश शुल्क अवघे ५० रुपये आहे.

मुख्य प्रायोजक : आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक : सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन अकॅडमी, संकल्प आय ए एस फोरम, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स

बँकिंग पार्टनर : युनियन बँक ऑफ इंडिया

पॉवर्ड बाय : ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी

कधीशनिवार, २५ मे व रविवार, २६ मे रोजी

कुठेदादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाट्य मंदिराच्या मागे, माटुंगा (पश्चिम)

केव्हासकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत