मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविल्याशिवाय हा भटकता आत्मा स्वस्थ बसणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. लोकांचा सहभाग असलेल्या या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ असून, हुकूमशाहचा पराभव करून संविधान व लोकशाही वाचविण्याचा निर्धार इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला.

वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे होती. सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ४ जूनला भाजपचा पराभव अटळ असल्याचा सूर सर्वच नेत्यांनी आळवला. मुंबईतील ही निवडणूक प्रचाराची सभा इंडिया आघाडीच्या विजयाची नांदी ठरणारी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी या विराट सभेचे वर्णन केले. काही दिवसांर्पू्वी भटकती आत्मा अशी मोदींनी पवारांवर टीका केली होता. त्याला पवारांनी प्रचाराच्या अखेरीस उत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जेरदार हल्ला केला. हा फुले, शाहू आंबेडकरांचा महाराज आहे, मोदी-शहा-अदानीचा होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. नाशिकच्या सभेत मोदी हिंदू-मुस्लीम भाषा करू लागले, त्यावेळी एक शेतकरी उभा राहून म्हणाला कांद्यावर बोला. त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला मोदी उत्तर देऊ शकले नाहीत.

हेही वाचा >>> भ्रष्टाचार हीच भाजपची गॅरंटी! ठाकरे

हुकूमशहाची नजर कशी राक्षसी असते त्याचा अनुभव लोकांनी घेतला. या हुकूमशहाचा विषाणू पासून देशाला वाचवायचे आहे. ४ जूनला मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वसामान्यांचे, लोकशाहीचे भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आहे. सत्ताबदल केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, असे आवाहन शरद पवार यांनी केले. नरेंद मोदींनी चारसो पारची घोषणा दिली आहे, परंतु भाजप दोनशे पारही करणार नाही, देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार, असा विश्वास खरगे यांनी व्यक्त केला.

खोटे बोलणे ही मोदींची गॅरंटी : खरगे

खोटे बोलणे, महागाई वाढवणे, रडून सहानुभूती मिळवणे, भ्रम पसरवणे, खोटी स्वप्ने दाखवणे, काँग्रेसला शिव्याशाप देणे, कारवाईची भीती दाखवणे ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी असून ते खोट्यांचे सरदार आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

घाटकोपर येथे जाहिरात फलक कोसळून १८ मुंबईकर नागरिकांचा बळी गेला. मोदी यांनी दुसऱ्या दिवशी त्या परिसरात रोड शो केला. दुर्घटनेतील जखमींची चौकशी करण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. इतका असंवेदनशील प्रधानमंत्री जगाच्या पाठीवर दुसरा नसेल, असा दावा खरगे यांनी केला.

मोदी जिंकले तर पवार, उद्धव तुरुंगात जातील : केजरीवाल

४ जूनला मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर शरद पवार, उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नेते तुरुंगात जातील, असा गंभीर इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवाल यांनी दिला. मोदी यांचा पराभव करण्यासाठी राज्यात ४२ जागा निवडून द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला केले.

दिल्लीकर नागरिक यांच्यासाठी मोहल्ला क्लिनिक काढत होतो. मोफत वीज देत होतो, म्हणून मला मोदींनी अटक केली. मला मधुमेह असतानासुद्धा तिहार जेलमध्ये इंशुलिन दिले नाही, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी एकमेव पर्याय आहे. निवडणूक काळात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण, मोदी यांनी शेतकऱ्याबाबत चकार शब्द उच्चारला नाही. मोदी शहा झुठों के सरदार आहेत. महाराष्ट्राची लूट करण्यासाठी राज्यातले आघाडी सरकार यांनी पाडले.

नाना पटोलेकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष

नकली शिवसेना आणि अजित पवार पक्ष कमलाबाईने जन्माला घातलेले पाप आहे. कमलाबाईला नागपूरचा पुरेना म्हणून ठाण्याचा घेतला. त्याला काम जमेना म्हणून बारामतीचा मिळवला. तो पुरे पडेना म्हणून नांदेडच्याला जवळ केले.

संजय राऊतखासदार, शिवसेना ठाकरे गट

विदर्भात महात्मा गांधी यांच्या हत्येचा प्रयत्न होणार होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार यांनी बापूंना सावध केले होते. दुर्देवाने बापूंचे खुनी आज जिवंत आहेत. फुले – शाहू-आंबेडकर यांच्या भूमिशी आज गद्दारांचे नाव जोडले जाणे दुर्भाग्यपूर्ण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुषार गांधीमहात्मा गांधीचे पणतू