तर अभ्यास गल्लीतील इमारतीसमोरील वृक्षाची कत्तल

प्रसाद रावकर

मुंबई: दक्षिण मुंबईमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला आणि माजी पर्यावरण मंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील मोक्याच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने जाहिरातींसाठी भलेमोठ्ठे फलक उभे करण्यात आले असून बहुसंख्य फलकांच्या आड येणाऱ्या वृक्षांची बेमालुमपणे छाटणी करण्यात येत आहे. त्यापैकी काही वृक्ष मरणपंथाला लागले आहेत. पोद्दार अभ्यास गल्लीतील बहुमजली इमारतीच्या प्रवेशद्वारात अडसर ठरणाऱ्या एका भल्यामोठ्या वृक्षाने नुकतीच मान टाकली असून वृक्षाच्या सर्व खुणा पुसून टाकण्यात आल्या आहेत. विधानसभेच्या मागील निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे विजयी झाले होते. मेट्रो ३ साठी वृक्षतोड करून आरे वसाहतीमध्ये कारशेड उभारण्यास आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात होर्डिंगआड येणाऱ्या वृक्षांची छाटणी करण्यात येत आहे.

Voting machines, Thane, Jitendra Awhad,
ठाण्यात भंगार अवस्थेत सापडली मतदान यंत्रे, मतदान ओळखपत्र सापडल्याने खळबळ, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला

वरळी विधानसभा मतदारसंघातील वरळी माक्यावरून महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या डॉ. ई. मोजेस रोड, हाजीअली येथून बेंगाल केमिकलदरम्यानचा डॉ. अॅनी बेझंट रस्ता, महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातील रखांगी चौकापासून (फेमस स्टुडिओ) माहीम चर्चच्या दिशेने जाणाऱ्या सेनापती बापट मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी भलेमोठ्ठा फलक उभा करण्यात आला आहे. डॉ. ई. मोजेस रस्त्यालगत रेल्वेच्या हद्दीत भलेमोठ्ठे फलक उभे करण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक वृक्ष या फलकासाठी अडसर ठरले होते. लगतच्या पदपथावरीलच नाही तर दुभाजकावरील वृक्षांमुळे दूरवरून फलक दिसत नव्हते. त्यामुळे रस्त्यालगतचेच नाहीत तर दुभाजकावरील वृक्षही मारण्यात आले आहेत. डॉ. अॅनी बेझंट रस्त्यावरील अंधांच्या शाळेच्या आवारात भलेमोठ्ठे फलक वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फलकाच्या आड झाडांचा डोलारा येऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे. सेनापती बापट मार्गावरील वृक्षांच्या बाबतीतही असाच प्रकार सुरू आहे.

हेही वाचा >>>वीजदेयक आंदोलनप्रकरण राहुल नार्वेकर, लोढांविरोधात आरोप निश्चिती

वरळी परिसरातील सुदाम काळू अहिरे मार्गावरील अभ्यासगल्ली सर्वश्रुत आहे. या परिसरात एक रसायनांचा कारखाना होता. या कारखान्याच्या जागेवर आज बहुमजली इमारत उभी राहिली आहे. बहुमजली इमारतीच्या अगदी प्रवेशद्वारासमोरच भलामोठ्ठा वृक्ष होता. गेल्या काही दिवसांपासून तो अचानक सुकून गेला आणि काही दिवसांपूर्वी तो जमीनदोस्त झाला. इतकेच नव्हे तर आता या वृक्षाच्या खुणाही तेथून नष्ट करण्यात आल्या असून इमारतीत जाण्या-येण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

हेही वाचा >>>बारसू आंदोलकांवरील गावबंदी आदेश मागे घेणार ; राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे वृक्ष संवर्धन, लागवडीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबईकरांना वृक्ष संपदेचे महत्त्व पटवून देण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र फलकांच्याआड येणाऱ्या वृक्षांची बेमालुमपणे छाटणी सुरू आहे. त्यामुळे वरळीतील वृक्ष हळूहळू अखेरच्या घटका मोजण्याच्या स्थितीत आहेत.