रविवारी मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला १५ वर्षं पूर्ण झाली. मात्र अजूनही त्या हल्ल्याच्या जखमा मुंबईकरांच्या मनात कायम आहेत. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे कुटुंबीय व प्रत्यक्ष हल्ल्यातून बचावलेल्या लोकांचे भीषण अनुभव अजूनही तितकेच ताजे वाटत आहेत. मुंबई हल्ल्याला १५ वर्षं पूर्ण झाली असताना या हल्ल्यात सापडलेले सुप्रसिद्ध व्यावसायिक अजय बग्गा यांनी एक्सवर (ट्विटर) त्यांचा तेव्हाचा अनुभव शेअर केला आहे. या पोस्टमध्ये बग्गा यांनी एक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो १५ वर्षांपूर्वी मुंबई हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलबाहेर काढण्यात आला आहे. त्या रात्री पाच वेळा आपण प्रत्यक्ष मृत्यूचा सामना केल्याचं अजय बग्गा यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांवर कसाबसह एकूण १० जणांनी मुंबईवर हल्ला चढवला होता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय हॉटेल, ट्रायडेंट हॉटेल, ताज पॅलेस, लिओपोल्ट कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा अशा अनेक ठिकाणी एकाच वेळी या दहशतवाद्यांनी हल्ला केला. तब्बल तीन दिवस मुंबईला या दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी धुमश्चक्री चालली होती. अखेर तीन दिवसांनंतर कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. इतर १० दहशतवाद्यांना पोलीस, एनएसजी कमांडोंनी कंठस्नान घातलं.

Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

अजय बग्गांनी शेअर केली ती आठवण!

दरम्यान, या हल्ल्यादरम्यान ताज पॅलेसमध्ये अडकलेल्या असंख्य लोकांपैकी व्यावसायिक अजय बग्गा हेही एक आहेत. त्यांच्या पत्नीसमवेत ते २६ नोव्हेंबरच्या रात्री ताज हॉटेलमध्ये अडकले होते. त्या वेळचा सविस्तर अनुभव त्यांनी फोटोसहित शेअर केला आहे. “२६/११… त्या दिवशी आमच्या दोघांचा पुनर्जन्मच झाला. हा फोटो (पोस्टसह शेअर केलेला फोटो) मी व माझी पत्नी रजिता बग्गाचा आहे. त्या दिवशी सकाळी आम्ही ताज हॉटेलच्या बाहेर जिवाच्या आकांताने धावत आलो होतो. कारण त्याआधी तब्बल १२ तास आम्ही हॉटेलात मृत्यूच्या छायेखाली होतो. आम्ही बाहेर धावत येताच पुन्हा एकदा गोळीबाराला सुरुवात झाली. त्या रात्री आम्ही पाच वेळा प्रत्यक्ष मृत्यूचा सामना केला”, असं अजय बग्गा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“आम्ही बाहेर आल्यावर पुन्हा गोळीबाराला सुरुवात झाली”

“त्या रात्री मी माझ्या पत्नीसमवेत ताजमधल्या मसाला क्राफ्ट रेस्तराँमध्ये जेवण करत होतो. रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबाराला सुरुवात झाली. तेव्हा आम्ही आत अडकलो ते थेट दुसऱ्या दिवशी साडेदहाच्या सुमारास ताजमधून बाहेर पडलो. एनएसजी कमांडो सकाळी तिथे दाखल झाले होते. त्यांनी आम्हाला बाहेर पडण्यासाठी कॉरिडोर तयार केलं होतं. आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो तेव्हा पुन्हा एकदा वरच्या मजल्यांवरून आमच्यावर गोळीबार सुरू झाला. त्यामुळे आम्ही एनएसजी कमांडोंच्या कवचाखाली तिथून वाचण्याचा प्रयत्न करत असताना हा फोटो काढण्यात आला आहे”, अशा शब्गांत बग्गा यांनी त्या दिवशीचा थरारक अनुभव शेअर केला आहे.

Mumbai 26/11 Attacks: ‘त्यादिवशी माझा पुनर्जन्मच झाला, त्या आठवणी कधीच विसरू शकत नाही’

“भारतीय लष्कर, एनएसजी, मुंबई पोलीस, ताज स्टाफ यांच्या धैर्याला व शौर्याला सलाम”, असंही त्यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटलं आहे.