मुंबई: करोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकून मोठय़ा प्रमाणात जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळली असताना मध्यस्थांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्येही पालिका अधिकाऱ्यांना पैसे दिल्याबाबतचे संभाषण आढळले आहे. याशिवाय जप्त करण्यात आलेल्या एका डायरीमध्येही पालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या पैशांच्या नोंदी आढळल्या आहेत.

करोनाकाळात मुंबई महानगरपालिकेने दिलेली कंत्राटे चार ते पाच मध्यस्थांच्या माध्यमातून देण्यात आली.  या व्यवहारांमध्ये मध्यस्थींचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्यासह यासीर फर्निचरवाला या प्रकरणात मध्यस्थी म्हणून काम करत होते. ईडीने बुधवारी व गुरुवारी छापा टाकून अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडीला संशयित मध्यस्थींच्या रोख व्यवहाराबाबत माहिती मिळाली असून व्हॉट्स अ‍ॅप संभाषणामध्येही पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या रकमेबाबत संभाषण सापडले आहे. त्या आधारे या प्रकरणांमध्ये मध्यस्थींच्या सहभागाबाबतचे पुरावे ईडीला सापडले आहेत. हा संपूर्ण गैरव्यवहारात राजकीय व्यक्ती, पालिका अधिकारी, मध्यस्थ व वितरक अथवा कंत्राटदार या घटकांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सूरज चव्हाण यांचा ३ ते ४ कंत्राटांमध्ये थेट संबंध असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. त्याशिवाय याबाबत ईडीने नोंदवलेल्या जबाबांमध्येही चव्हाणच्या सहभागाबाबत उल्लेख आहे. आता ईडीने याप्रकरणी सोमवारी चव्हाणला चौकशीसाठी बोलावले असून मालमत्तेसह कंत्राटातील सहभाग व व्यवहार यांबाबतही ईडी त्यांना प्रश्न विचारू शकते. याशिवाय यासिर फर्निचरवाला याचा सहभागही मध्यस्थ म्हणून उघड झाला आहे. त्यांचे व्यवहार व पालिका अधिकाऱ्यांशी संबंध याबाबतही ईडी तपास करत आहे. ईडी याप्रकरणी मध्यस्थींच्या सहभागाबाबत तपास करत आहे. त्यांच्यामार्फत पालिका अधिकारी व राजकीय व्यक्तींच्या सहभागाबाबत पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. चव्हाणसह सुमारे चौघांची याप्रकरणी सोमवारी चौकशी होण्याची शक्यता आहे.

छाप्यामध्ये पालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या पैशांच्या नोंदी ईडीने याप्रकरणी टाकलेल्या छाप्यामध्ये एका संशयित मध्यस्थांकडून एक डायरी सापडली आहे. त्यात पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पैशांची माहिती लिहिण्यात आली आहे. त्याबाबत ईडी चौकशी करत आहे.

सुजीत पाटकर यांना अटकेपासून तूर्त दिलासा

मुंबई : वरळी आणि दहिसर येथील जंबो करोना काळजी केंद्राचे कंत्राट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपप्रकरणी व्यावसायिक सुजीत पाटकर यांना विशेष न्यायालयाने ११ जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. पाटकर हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. या प्रकरणाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून (ईओडब्ल्यू) चौकशी केली जात असून अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी पाटकर यांनी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सांगण्यावरून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.