मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत २०० किमी लांबीच्या रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करण्यात येणार असून यात अंधेरी, जोगेश्वरीतील ११ रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. या कामासाठी पालिका १२ कोटी १५ लाख रुपये खर्च करणार आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. काँक्रीटीकरणाच्या कामात समाविष्ट नसलेल्या रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण किंवा सपाटीकरण करण्यात येणार आहे. मध्यमुंबईतील ४२ रस्त्यांबरोबरच अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम मधील ११ रस्ते यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या ११ रस्त्यांसाठी पालिका १२ कोटी खर्च करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’वरून संजय राऊतांची भाजपावर टीका; म्हणाले, “मोदी आणि शाहांचं राज्य आल्यापासून…”

पालिकेने हाती घेतलेल्या मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत १२० किमी लांबीच्या रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. डांबरी व पेव्हर ब्लॉकचे रस्ते हे विविध कारणांमुळे खराब होतात. झीज होणे, भेगा पडणे, वाहनांची वर्दळ, पाऊस यामुळे रस्ते खडबडीत होतात, खड्डे पडतात. त्यामुळे रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. ज्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे त्यांची कामे पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार असल्यामुळे या कालावधीत उर्वरित रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण करण्यात येणार आहे. डांबरीकरण, पेव्हरब्लॉकद्वारे हे पुनर्पृष्ठीकरण करण्यात येणार आहे. कार्यादेश दिल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत पुनर्पृष्ठीकरण करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>शरद पवारांवर टीका करताना गुणरत्न सदावर्तेंनी पातळी सोडली, आजाराचा उल्लेख करत म्हणाले, “तोंडाला…”

या रस्त्यांचे होणार पुनर्पृष्ठीकरण
लोखंडवाला क्रॉस लेन ४, भगतसिंग मार्ग, नरसी मोंजी रोड, सेंट झेवियर रोड, उपासना लेन, वैशाली नगर रोड, वर्सोवा महापालिका शाळा ते पोशा नाखवा गार्डन पर्यंतचा रस्ता, वर्सोवा पोलीस स्थानकासमोरचा रस्ता, दादाभाई क्रॉस रोड नं २, म्हातारपाडा रोड, दाऊद बाग रोड.
मुंबईत २०५० किमीचे रस्ते असून सुमारे १००० किमी लांबीच्या रस्त्यांचे आधीच कॉंक्रीटीकरण झाले आहे. आणखी २०० किमीच्या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामांचे कार्यादेश दिले आहेत. आणखी ४०० किमीच्या रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या व्यतिरिक्त जे रस्ते आहेत त्यातून पुनर्पृष्टीकरणासाठी रस्त्यांची निवड केली जाणार आहे. ज्या रस्त्यांचा केवळ वरचा भाग खडबडीत झाला आहे, अशा रस्त्यांची या कामासाठी निवड केली जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leveling of eleven roads in andheri west by mumbai municipal corporation mumbai print news amy
First published on: 29-01-2023 at 21:07 IST