शरद पवारांवर टीका करताना गुणरत्न सदावर्तेंनी पातळी सोडली, आजाराचा उल्लेख करत म्हणाले, "तोंडाला..." | gunratan sadavarte participated in mumbai hindu jan akrosh morcha comment on love jihad and sharad pawar mouth disease | Loksatta

शरद पवारांवर टीका करताना गुणरत्न सदावर्तेंनी पातळी सोडली, आजाराचा उल्लेख करत म्हणाले, “तोंडाला…”

लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन आज (२९ जानेवारी) मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

शरद पवारांवर टीका करताना गुणरत्न सदावर्तेंनी पातळी सोडली, आजाराचा उल्लेख करत म्हणाले, “तोंडाला…”

लव्ह जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला घेऊन आज (२९ जानेवारी) मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये भाजपा तसेच शिंदे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले. याच मोर्चात सामाजिक कार्यकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते हेदेखील सहभागी झाले. त्यांनी मोर्चामध्ये सहभागी होत कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा >> “मला ‘लव्ह’ आणि ‘जिहाद’चा अर्थ कळतो पण..”, सुप्रिया सुळे यांचं विधान

दाऊद इब्राहीमचा, बाबरचा विचार दफन करा

“पाकिस्तानी लोकांच्या नीच विचारांमधून लव्ह जिहाद सुरू झाला आहे. या लव्ह जिहादला गाडण्यासाठी आज मुंबईत हिंदू समाज एकवटला आहे. लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा अशी आम्ही मागणी करतो. दाऊद इब्राहीमचा, बाबरचा विचार दफन करा. संत म्हणून आले आणि धर्मप्रचार करायला लागले आहेत,” असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

हेही वाचा >> नाना पटोलेंच्या ‘त्या’ दाव्यावर सत्यजित तांबेंचे थेट विधान; म्हणाले, “जेव्हा सत्य सांगेन तेव्हा चकित व्हाल, लवकरच…”

त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते, मग…

गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावरदेखील पातळी सोडून टीका केली. “याच सर्व बाबी लक्षात घेता आज येथे हिंदू समाज एकवटला आहे. शरद पवार यांच्या तोंडाला आजार झालेला आहे. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते. मग लव्ह जिहादच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत. हैदाबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही,” असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

“या सर्वांनाच प्रश्न विचारण्यासाठी, त्यांना उघडे पाडण्यासाठी तसेच लव्ह जिहादला ठोकरून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत,” असेही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

हेही वाचा >> बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे, धक्कातंत्र कोणी शिकवलं? एकनाथ शिंदेंनी दिलं खास उत्तर; म्हणाले, “खरा धक्का…”

दरम्यान, मुंबईत आयोजित केलेल्या या हिंदू जनआक्रोश मोर्चात भाजपाचे अनेक नेते सहभागी झाले. यामध्ये नारायण राणे, किरीट सोमय्या यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. या मोर्चादरम्यान लव्ह जिहादविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच धर्मांतरविरोधी कायदा आणावा अशी मागणी करण्यात आली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 13:59 IST
Next Story
मुंबई विमानतळावर विमान उतरण्याआधीच इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न, प्रवासी पोलिसांच्या ताब्यात