‘लोकसत्ता अर्थभान’च्या मंचावर रविवारी मार्गदर्शन; घाटकोपर येथे कार्यक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक तसेच देशांतर्गत अर्थव्यवस्था सावरत असताना करदात्यांचे आर्थिक नियोजन कसे असावे? भांडवली बाजार, म्युच्युअल फंड यासारख्या पर्यायांबरोबरच स्थिर परतावा देणाऱ्या, तुलनेत कमी जोखीम असलेल्या पर्यायांबाबत गुंतवणुकीचे धोरण कसे असावे? या व अशा प्रश्नांची उत्तरे येत्या रविवारी घाटकोपर येथे ‘लोकसत्ता अर्थभान’च्या मंचावर मिळणार आहेत.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूक उपक्रमाच्या अर्थसाक्षरता पर्वातील कार्यक्रम रविवार, २३ डिसेंबर २०१८ रोजी श्रीमती पी. एन. दोशी वुमन्स कॉलेज ऑडिटोरियम (एसएनडीटी), कामा गल्ली, घाटकोपर (पश्चिम) येथे होत आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. निमंत्रितांकरिता काही जागा राखीव आहेत. या माध्यमातून गुंतवणूकदारांना बचतीविषयीच्या शंकांचे निरसन उपस्थित तज्ज्ञांना प्रश्न विचारून करून घेता येईल.

नवे वित्त वर्ष सुरू होण्यास काही महिन्यांचाच कालावधी असताना आर्थिक नियोजनाबाबतचे धोरण, जमा-खर्च आणि बचतीचा योग्य विनियोग याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन या उपक्रमाद्वारे होणार आहे. आर्थिक नियोजनकार तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञ या वेळी सविस्तर भाष्य करतील.

पोस्टातील-बँकांमधील ठेवी, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तिवेतन आदी पारंपरिक पर्यायांतील गुंतवणुकीबाबत सद्य:स्थितीत काय निर्णय घ्यावे, सोने-स्थावर मालमत्तेबाबतचा विद्यमान कल पाहून कोणती भूमिका घ्यावी, याबाबत सनदी लेखापाल तृप्ती राणे मार्गदर्शन करतील. ‘अर्थनियोजनाचा श्रीगणेशा’ या विषयाद्वारे विविध वयोगटांतील गुंतवणुकीचे आराखडे तयार करण्याबाबतही ते सविस्तर विवेचन करतील.

भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंड या एकमेकांशी घनिष्ठ संबंध असलेल्या नवगुंतवणूक पर्यायांबाबतची सविस्तर माहिती आर्थिक नियोजनकार सुयोग काळे या वेळी देतील. ‘इक्विटी आणि म्युच्युअल फंड’ हा त्यांचा विषय असून भांडवली बाजाराचा फंडांशी येणारा संबंध, समभागांची मूल्य हालचाल आणि त्याचा विविध फंडांवर होणारा परिणाम याविषयीचे सविस्तर विवेचन ते करतील.

वक्ते

तृप्ती राणे :

अर्थनियोजनाचा श्रीगणेशा

सुयोग काळे : इक्विटी आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक

कधी?

रविवार २३ डिसेंबर २०१८, सकाळी १०.३० वाजता

कुठे?

श्रीमती पी. एन. दोशी वुमन्स कॉलेज ऑडिटोरियम (एसएनडीटी), कामा गल्ली, घाटकोपर (पश्चिम)

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta arthbhan event in ghatkopar on sunday
First published on: 21-12-2018 at 03:56 IST