scorecardresearch

करिअर संधींचा खजिना; ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ दोन दिवसीय कार्यशाळा आजपासून, निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांच्या हस्ते उद्घाटन

‘यूपीएससी’ परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे हिच्याशी संवाद साधण्याची संधी आज, या कार्यशाळेत मिळेल. 

loksatta marg yashacha career workshop in mumbai
लोकसत्ता मार्ग यशाचा’

‘यूपीएससी’तील यशवंत डॉ. कश्मिरा संखे हिच्याशी संवादाची संधी 

मुंबई : शैक्षणिक प्रवासाला कलाटणी देणाऱ्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, पुढील करिअरसाठी दिशादर्शक ठरणारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळा आज आणि उद्या  रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे होणार आहे. निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होईल. ‘यूपीएससी’ परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे हिच्याशी संवाद साधण्याची संधी आज, या कार्यशाळेत मिळेल. 

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा २०२२ परीक्षेत ठाण्यातील डॉ. कश्मिरा संखे हिने राज्यात प्रथम आणि देशात पंचवीसावे स्थान पटकावले. कश्मिराने ‘बीडीएस’चे शिक्षण पूर्ण केले आहे. स्वत:चा व्यवसाय सांभाळून आणि वेळेचे योग्य नियोजन करून तिने ही यशस्वी भरारी घेतली आहे. तिच्याशी संवाद साधण्याची संधी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत शुक्रवारी उपस्थितांना मिळणार आहे.

 बारावीनंतर नेमके कोणते क्षेत्र निवडावे, त्यासाठी प्रवेश प्रक्रिया कशी असते, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रासह इतर उच्च शिक्षणाच्या संधींबाबत करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर हे मार्गदर्शन करतील. निकाल, स्पर्धेला तोंड देताना येणारा ताण कसा हाताळावा, याबाबत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ (पान २ वर) (पान १ वरून) डॉ. राजेंद्र बर्वे हे शुक्रवारी तर डॉ. हरीश शेट्टी हे शनिवारी मार्गदर्शन करणार आहेत.  निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे हे प्रशासकीय सेवांमधील संधी, बदलत्या परिस्थितीनुसार क्षेत्र निवड, स्पर्धा परीक्षा यांबाबत उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. डॉ. नितीन करमळकर हे नवीन शैक्षणिक धोरणाबाबत आणि केतन जोशी हे कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटी व सोशल मीडियाबाबत मार्गदर्शन करतील. संशोधन क्षेत्र आणि संधी या विषयावर डॉ. अनिकेत सुळे हे शुक्रवारी तर डॉ. अरिवद नातू हे शनिवारी मार्गदर्शन करणार आहेत.

प्रवेशिका कार्यक्रमस्थळी

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. कार्यक्रमाच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळी मिळतील.

सहभागासाठी नोंदणी : http://tiny.cc/MargYashacha_2023

मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू होणार आहे. अर्ज कसा भरावा, काय काळजी घ्यावी, अशा विविध मुद्दय़ांसह प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाचे प्रतिनिधीही या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.

मुख्य प्रायोजक

* आयटीएम स्किल्स युनिव्हर्सिटी

सहप्रायोजक

* महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.

* स्टेट बँक ऑफ इंडिया

* व्हिजन आयएएस

* तासगावकर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट्स

* डी वाय पाटील युनिव्हर्सिटी

* विद्यालंकार क्लासेस

पॉवर्ड बाय:

* अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई 

* गो-स्कूल

* शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट्स, पुणे</p>

* ठाकूर इन्स्टिटयूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी

* आय सी ई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी

* ए के एज्युकेशनल कंसल्टंट्स

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2023 at 12:52 IST

संबंधित बातम्या