मुंबई : मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी तसेच मधमाशा पालनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी देशात प्रथमच मध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १८ व १९ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार असून महोत्सवाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

देशातील पहिले मध संचालनालय १९४६ साली महाबळेश्वर येथे स्थापन करण्यात आले. त्यानंतर केंद्र शासनानेही मध संचालनालय सुरु केले. महाराष्ट्रात मधाचा सर्वाधिक, पाचशे रुपये हमीभाव दिला जातो. आजमितीला राज्यात १०७९ गावांमध्ये ४ हजार ५३९ शेतकरी मध उत्पादन करत आहेत.

हेही वाचा >>>नायरपाठोपाठ शीव व कूपरमध्येही विशेष मुलांसाठी पुनर्वसन केंद्र?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध योजना राबवित असते. त्यात प्रामुख्याने ‘मध केंद्र योजना’ व ‘मधाचे गाव’ या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मध महोत्सवात मध, मेण यांपासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांची विक्री करणारे कक्ष असतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.