मागाठाणे लेण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आता स्थानिक रहिवासी आणि बिल्डर ट्रली क्रिएटिव्ह डेव्हलपर्स यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या लेण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबाला बाजूलाच होणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये घर देण्याचा निर्णय बिल्डर राजेंद्र बर्डे यांनी घेतला असून त्यामुळे मागाठाणे लेण्यांच्या संरक्षण आणि संवर्धन मोहिमेस बळकटीच येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे लेण्यांच्या परिसरात कोणताही प्रकल्प न राबवता लागूनच असलेल्या भूखंडावर निवासी घरे उभारण्यात येतील, असेही बर्डे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहाव्या शतकातील मागाठाणेच्या बौद्ध लेणी अजिंठाला समकालीन असल्यामुळे महत्त्वाच्या ठरतात. मात्र २०१० साली केंद्र आणि राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेमध्ये घेतलेल्या भूमिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. जतन करण्याइतके महत्त्वाचे या लेण्यांमध्ये काहीही नाही, असा अहवाल राज्य पुरातत्त्व खात्यातील अधिकाऱ्यांनी न्यायालयास सादर केला होता. त्यानंतर दोन्ही सरकारांच्या या भूमिकेमुळे न्यायालय काहीही करू शकत नाही, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली होती. त्यानंतर केंद्र व राज्य दोघांनाही याबाबत हात वर केल्याने आजपर्यंत या लेणींची परवड सुरूच आहे. लोकसत्ताने बुधवारी बाबतचे वृत्त प्रसिद्ध केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Magathane caves issue
First published on: 31-05-2018 at 00:31 IST