मुंबई : कृषी क्षेत्रासाठी ९७१० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेची सहा हजार कोटी रुपयांची रक्कम वजा जाता राज्य पुरस्कृत योजना, केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये राज्याचा ४० टक्के वाटा आणि सूक्ष्म सिंचनाचे थकलेले अनुदान देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कृत्रिम बुद्धिमता आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून कृषीचे गुलाबी चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक पाहणी अहवालात कृषी क्षेत्राच्या दमदार कामगिरीचे कौतुक करण्यात आले असले तरीही प्रत्यक्ष अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठीची तरतूद सरासरी इतकीच आहे.

प्रमुख योजना

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) २१०० कोटी.

● नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प – ३५१.४२ कोटी.

● महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क – मॅग्नेट २.० – २१०० कोटी रुपये बाह्यसहाय्यित.

● कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रसार – ५०० कोटी (दोन वर्षे)

● नैसर्गिक शेती – २५५ कोटी.

● मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज अंतर्गत ४५ लाख कृषी पंपांना मोफत वीज.

● गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार

● बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● प्रत्येक तालुक्यात बाजार समिती