मुंबई : महाराष्ट्रातील २४ आणि गोवा राज्यातील ४ प्रशिक्षणार्थिंना ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत युद्धजन्य परिस्थितीला तोेंड देण्यासंदर्भात २१ दिवसांच्या प्रशिक्षणाचा समारोप मुंबईतील नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये ‘महाराष्ट्र नागरी संरक्षण’चे उपसंचालक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्याचे प्रशिक्षण देण्याचे सर्व राज्यांतील नागरी संरक्षण दलांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार ‘मास्टर्स ट्रेनर्स’ तयार करण्यासाठी राज्यातील २० आणि गोवामधील ४ प्रशिक्षणार्थिंची निवड करण्यात आली होती. पहिल्या ९ दिवसांच्या सत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन, आपत्कालीन संदेशवहन याचे प्रशिक्षण देण्यात आले, तर दुसऱ्या १२ दिवसांच्या सत्रामध्ये रासायनिक, जैविक, किरणोत्सारिता व आण्विक प्रतिसाद यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.