अंधेरीतील २८ वर्षांच्या तरूण सायबर फसवणूकीला बळी पडला आहे. आरोपींनी गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली त्याची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपींनी शेती संबंधित वस्तूंमध्ये गुंतवणूकीतून १५ दिवसांत १५ टक्के फायदा देण्याचे आमिष दाखवले होते. सुरूवातीला त्याला काही रक्कम मिळाली. त्यामुळे त्याने ५० लाख ८६ हजार रुपये गुंतवले व त्यानंतर आरोपींची त्याची फसवणूक केली.

हेही वाचा >>>मुंबईः केवळ ११०० रुपयांमध्ये मिळत होते आधारकार्ड, पॅनकार्ड ; वाचा नक्की काय प्रकरण आहे ते…

तक्रारदार मूळचा तामिळनाडू येथील रहिवासी असून गेल्या दोन वर्षांपासून अंधेरी येथे राहतो. जुलै २०२१ मध्ये त्याला मुंबईतील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी लागली. नोव्हेंबर २०२० मध्ये त्याने एक गुंतवणूक विषयक जाहिरात पाहिली होती. दुस-या दिवशी तक्रारदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यावर त्याला चित्रा मुथुरामन नावाच्या एका महिलेचा दूरध्वनी आला. तिने चेन्नईमधील कंपनी हिजाऊ असोसिएट्समध्ये व्यवस्थापक असल्याचे सांगितले. तिची कंपनी बियाणे, खते आणि इतर उत्पादनांचा कृषी उत्पादनांचा व्यवसाय करते. कृषी उत्पादनांच्या व्यवसायात पैसे गुंतवल्यास एखाद्या व्यक्तीला चांगले फायदेशीर उत्पन्न मिळू शकते, असे तिने सांगितले. तिच्या कंपनीचे नायजेरियामधील कंपनीशी व्यावसायिक संबंध असून ती नायजेरीयन कंपनी कृषी उत्पादनांवर गुंतवणूक करून १५ टक्के नफा मिळविण्यात मदत करेल, असे सांगितले.

हेही वाचा >>>मुंबई : गोवर संशयित रुग्णांच्या मृत्युची संख्या एकने कमी झाली ; कशी ती वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्राने तक्रारदाराचा भ्रमणध्वनी क्रमांक हिजाऊ असोसिएट्सच्या उपाध्यक्षाला पाठवला. त्यानंतर सेल्वम स्वामीप्पन नावाच्या व्यक्तीला त्याला दूरध्वनी आला. त्याने तक्रारदाराला आणखी योजना समजावून सांगितली. तसेच तीन महिन्यांच्या आत त्यांची गुंतवणूक काढून घेऊ शकतात, असे सांगितले. तसेच दर १५ दिवसांत १५ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले. ३० डिसेंबर २०२० ला एक लाख रुपये गुंतवले त्याबाबत त्याला १० जानेवारी २०२१ ला १६ हजार रुपयांचा नफा मिळाला. तक्रारदाराने कंपनीवर विश्वास ठेवून हळूहळू पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. त्याला परतावा देण्याचे आश्वासन मिळत असल्याने त्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आणि ४० लाखांचे कर्ज घेतले. तक्रारदाराने जून २०२२ पर्यंत ७६ लाख ११ हजार रुपयांची गुंतवणूक केली. याच्या तुलनेत त्याला २५ लाख रुपयांचा नफा झाला. पण तक्रारदाराला ती रक्कम मिळाली नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले त्यानुसार त्याने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणात नायजेरीयन टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.