मुंबई महापालिकेचा नवा नियम पाळणे बंधनकारक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : लक्षणे नसलेले किं वा सौम्य लक्षणे असलेल्या करोना बाधित रुग्णांसाठी गृह विलगीकरणाचा एकू ण कालवधी सतरा दिवसांचा असल्याचे पालिके ने स्पष्ट के ले आहे. हा कालावधी पाळणे आवश्यक असून त्यात कोणतीही कपात करण्यात आली नसल्याचे पालिके च्या आरोग्य विभागाने स्पष्ट के ले आहे.

गृह विलगीकरणासंदर्भात पालिके ने नुकतीच  सुधारित सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर के ली होती. सुधारित सूचनांनुसार आता एकूण सतरा दिवस विलगीकरण पाळणे आवश्यक आहे.

लक्षणे नसलेले बाधित (असिम्पमॅटिक) किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच विलग राहून आणि सोबत योग्य औषधोपचार घेवून लवकर बरे होवू शकतात. असे रुग्ण बाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. त्यासाठी संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे आवश्यक राहील. त्यानंतर इतर सर्व रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस गृह विलगीकरण पाळणे आवश्यकच आहे. म्हणजेच दहा अधिक सात असे एकूण सतरा दिवस गृह विलगीकरण कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही सूट दिलेली नाही, असे पालिके ने स्पष्ट के ले आहे. तसेच विलगीकरण कालावधी योग्यरीत्या पाळून सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याच्या  कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.  मंगला गोमारे यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mandatory to follow the new rules of mumbai municipal corporation home isolation akp
First published on: 04-04-2021 at 01:24 IST