मुंबई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी प्रशासनात मोठे फेरबदल करीत 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यानुसार वसई- विरार महापालिकेच्या आयुक्तपदी मनोज कुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दीपा मुधोळ- मुंडे यांची समाज कल्याण आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्य महसूल सेवेतून भारतीय प्रशासन सेवेत दाखल झालेल्या डझनभर अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. निलेश घटने यांची पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, ज्ञानेश्वर खिलारी यांची जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त भूमी अभिलेखपदी तर अनिल पवार यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश कुमार खडके यांचे पुणे येथे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, भालचंद्र चव्हाण यांची राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संचालकपदी, विजयसिंह देशमुख यांची अण्णासाहेब जाधव आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, विजय भाकरे यांची विदर्भ वैधानिक महामंडळाच्या सदस्य सचिवपदी, त्रिगुण कुलकर्णी यांची यशदाच्या उपमहासंचालकपदी, गजानन पाटील यांची पुणे जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी पंकज देवरे यांची, महेश पाटील यांची आदिवासी विकास आणि संशोधन परिषदेच्या आयुक्तपदी, मंजिरी मनोरकर यांची राज्य शेती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, आशा खान पठाण यांची मुख्यमंत्री कार्यालयात नागपूर येथे