मुंबई : मराठा कुणबी/कुणबी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आतापर्यंत विविध दस्तावेजांतील ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदींचा शोध घेतला आहे. या नोंदींचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार असून आतापर्यंत या नोंदींच्या आधारे ८ लाख २५ हजार ८५१ लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असून त्यांचा इतर मागासवर्गात समावेश झाला.

शिंदे समितीचा चौथा अहवाल मागील महिन्यात मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला. शिंदे समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही समिती हैदराबाद गॅझेटिअर्स तसेच बॉम्बे व सातारा गॅझेटिअर्समधील नोंदींचाही शोध घेणार आहे. आतापर्यंत सापडलेल्या ५८ लाख ८२ हजार नोंदींपैकी कोकण विभागात ८,२५,२४७ नोंदी, पुणे विभागात ७,०२,५१३ नोंदी, नाशिक विभागात ८,२७,४६५ नोंदी, छत्रपती संजाभीनगरमध्ये ४७,७९५ नोंदी, अमरावती विभागात सर्वाधिक २५,७४,३६९ नोंदी तर नागपूर विभागात ९,०४,९७६ नोंदी आढळल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ७ लाख ४७ हजार ४३९ तर सर्वात कमी ९८४ नोंदी या लातूर जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदी आढळल्या आहेत.

अहवाल लवकरच सरकारकडे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुणबी मराठा नोंदींचा शोध घेणाऱ्या शिंदे समितीचे काम अंतिम टप्प्यात असून हैदराबाद गॅझेटिअर्स तसेच बॉम्बे व सातारा गॅझेटिअर्सचा शोधही पूर्ण होत आला आहे. जून महिन्यात या समितीचा शेवटचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे.