लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : “भारताची चित्रपटसृष्टी ही मराठी चित्रपटसृष्टीतून उभी राहिली. आम्हा सर्व कलाकारांची इच्छा आहे की चित्रपटसृष्टीची ओळख ही मराठी चित्रपटच असली पाहिजे”, असे मत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केले.

जिओ स्टुडिओजच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिओ स्टुडिओ या ओटीटी वाहिनीने पहिल्यांदाच हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमधील, वेगवेगळ्या धाटणीच्या १०० चित्रपट आणि वेब मालिका प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. भारतातील प्रत्येक भाषा, संस्कृती यांची गोष्ट मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचे जिओ स्टुडिओजच्यावतीने सांगण्यात आले.

हेही वाचा…. मेट्रो ३ चे संचालन आणि देखभालीची जबाबदारी डीएमआरसीकडे?

जिओ स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या नव्या उपक्रमात मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली या भाषांत चित्रपटगृहांमध्ये गाजलेले चित्रपटही प्रदर्शित केले जाणार आहेत. याशिवाय नव्या वेब मालिका भारतातील स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले आणि पुरस्कारप्राप्त चित्रपटही जिओ स्टुडिओजच्या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित केले जाणार आहेत. यात ‘बाईपण भारी देवा’, ‘गोदावरी’, ‘मी वसंतराव’, या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, ‘फोर ब्लाइंड मेन’, ‘वनटूथ्रीफोर’, ‘खरवस’, ‘काटा किर्रर्र’, ‘खाशाबा’, या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटांची मांदियाळी प्रेक्षकांना अनुभवता येईल. याशिवाय ‘कालसूत्र’, ‘एका कलेचे मणी’, ‘अगं आई अहो आई’, या मराठीतील प्रीमियम वेब मालिकांचाही समावेश आहे.

हेही वाचा…. प्रसिद्ध अभिनेत्रीची वित्त पुरवठादाराविरोधात विनयभंगाची तक्रार, जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आजवर हिंदी चित्रपटसृष्टीने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या कॉप युनिवर्सचा आनंद घेतला. पण आता जिओच्या उपक्रमातून बंगाली चित्रपटसृष्टीतील कॉप युनिवर्स प्रेक्षकांना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातील शंभर गोष्टी तीन वर्षांच्या कालावधीत चित्रपट आणि वेब मालिकांमधून विविध भाषेत मांडण्यात आल्या आहेत. यात हिंदीतील डंकी, ब्लडी डॅडी, भेडिया 2, अनटायटल, स्त्री २, सेक्शन ८४, हिसाब बराबर, जरा हटके जरा बचके, ब्लॅकआउट, मुंबईकर, द स्टोरीटेलर, धूम धाम या चित्रपटांचा समावेश आहे. लाल बत्ती, रफुचक्कर, बजाओ, द मॅजिक ऑफ शिरी अशा काही नव्या वेब मालिकांचाही समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi films are the identity of india film industry said by subodh bhave mumbai print news dvr
First published on: 14-04-2023 at 13:09 IST