मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात २५ ऑक्टोबरला वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश देण्याचा निर्णय एमसीएने घेतला आहे. ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही लढत पाहण्यासाठी हजर राहणार आहेत आणि त्यावेळी हा धनादेश सुपूर्द करण्यात येईल,’’ अशी माहिती एमसीएचे उपाध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली.