माध्यमांवर बाह्य नियंत्रण राजकीय व्यवस्थेकडून येणार नाही, तर न्यायव्यवस्थेकडून येण्याची शक्यता आहे. न्यायव्यवस्थेला माध्यमांवर नियंत्रण ठेवण्यापासून रोखण्यासाठी माध्यमांनीच स्वनियंत्रण ठेवावे, असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी ‘मुंबई प्रेस क्लब’च्या पुरस्कार सोहळय़ात केले.
प्रेस क्लबतर्फे ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि कुलदीय नय्यर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल शंकर नारायणन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी १९ पत्रकारांना सवरेत्कृष्ट पत्रकारितेसाठी ‘रेड इंक’ पुरस्कार देण्यात आले. नय्यर यांच्यावतीने त्यांची पत्नी भारती यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी ‘माध्यमांचे स्वातंत्र्य’ यावर परिसंवाद झाला. त्याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Media should follow self regulation manish tewari
First published on: 27-05-2013 at 02:38 IST