मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Normal train journeys cancelled due to air-conditioned suburban trains
रेल्वेच्या वक्तशीरपणात ‘एसी’चा खोडा; गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट
Mega block on Sunday on Western Railway
मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
sale of scrap, Western Railway,
पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.३० – पहाटे ४.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा –

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.४० – पहाटे ४.४० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल, पनवेल – ठाणे लोकल फेऱ्या बंद असतील. ब्लॉक काळात ठाणे – वाशी / नेरुळ दरम्यान ट्रान्स हार्बर मार्ग सुरू असेल.

हेही वाचा –

पश्चिम रेल्वे

कुठे : मुंबई सेंट्रल – माहीम दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.३० – पहाटे ४ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सर्व जलद लोकल सांताक्रूझ – चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावर धावतील.