मुंबई : मुंबईसारख्या महानगरांसाठी पुढील काही तासांसाठी दिल्या जाणाऱ्या हवामान अंदाजात आणखी अचूकता आणि तत्परता असणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले. सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अचानक पडणारा पाऊस, वादळी वारे किंवा जलद बदलणाऱ्या परिस्थितीमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात.
विशेषत: पुढील २ ते ३ तासांसाठी दिला जाणारा ‘तत्काळ हवामान अंदाज’ अधिक अचूक आणि वेळेवर मिळणे गरजेचे आहे. असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मुंबईसारख्या शहरात वाहतूक, लोकल सेवा, विमान सेवा यावर हवामानाचा थेट परिणाम होतो. अशा वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी तातडीचा अंदाज आणि योग्य इशारा महत्त्वाचा ठरतो. दरम्यान, हवामान विभागाच्या यंत्रणेत सुधारणा झाली असली तरी, अजूनही वेळोवेळी अंदाज चुकतात किंवा उशिरा मिळतात, अशी टीका मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पावसाचे इशारे हवामान विभागाकडून वेळीच मिळालेले नाहीत.
जून महिन्यात अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकारंची तारांबळ उडाली. मात्र त्यावेळी हवामान विभागाकडून योग्य तो इशारा दिला गेला नाही. दिवसभरात तीन वेळा हवामान विभागाने इशारा बदलून दिला. त्यामुळे मुंबईकरांचा गोंधळ उडाला. दरम्यान, मुंबईसाठी पावसाचा अंदाज देताना तत्काळ हवामान अंदाजाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना अचूक आणि योग्य वेळेत पावसाचा इशारा प्राप्त होईल, असे मत पुणे हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केले.
सध्याच्या अंदाज प्रणालीवर टीका
सध्या हवामान विभागाकडून दिले जाणारे अंदाज आणि इशारे अनेकदा चुकतात किंवा उशिराने दिले जातात, अशी तक्रार नागरिकांमध्ये वारंवार होत आहे. हवामान विभागाने दिलेला अंदाज काही वेळातच फोल ठरतो, अशी टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार, पर्यंटक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
राज्यात पावसाची उघडीप
संपूर्ण राज्यात मंगळवारी मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर बुधवारी मात्र सर्वत्र पावसाची उघडीप होती. विदर्भात अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस विदर्भ वगळता इतर भागात पावसाचा फारसा जोर नसेल. अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागात गुरुवारी गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकणात सर्वाधिक पाऊस
राज्यात मंगळवारी अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी ८:३० ते बुधवारी सकाळी ८:३० पर्यंत झालेल्या पावसाची नोंद (तालुकानिहाय)