Mumbai Metro 3 Phase 2B Inauguration Latest Updates / मुंबई – बहुप्रतिक्षित कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या शेवटच्या १०.९९ किमीच्या टप्प्याचे लोकार्पण बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. आता गुरुवारपासून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

सकाळी ५.५५ वाजता कफ परेड मेट्रो स्थानकावरुन पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे. आरे ते कफ परेड अशी भुयारी मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे. शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाल्याने आता दक्षिण मुंबईतील अत्यंत वर्दळीच्या महालक्ष्मी, गिरगाव, काळबादेवी, चर्चगेट, सीएसएमटी, विधान भवन अशा ठिकाणी पोहचता येणार आहे. त्यामुळे या मार्गिकेला आता प्रवाशांचा, मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा यानिमित्ताने एणएमआरसीने व्यक्त केली आहे.

३३.५ किमीची भुयारी मेट्रो मार्गिका

  • खर्च अंदाजे ३७ हजार कोटी
  • कामास सुरुवात २०१७
  • तीन टप्प्यात काम

पहिला टप्पा – आरे ते बीकेसी – १२.६९ किमीचा टप्पा

  • १० स्थानकांचा समावेश
  • आॅक्टोबर २०२४ मध्ये सेवेत

दुसरा टप्पा – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक – ९.७७ किमीचा टप्पा

  • ०६ स्थानके
  • मे २०२५ मध्ये सेवेत

तिसरा टप्पा – आचार्य अत्रे चौक ते कफ परेड – १०.९९ किमीचा टप्पा

  • ११ स्थानके
  • ९ आॅक्टोबर २०२५ मध्ये सेवेत

२७ स्थानके

आरे जेव्हीएलआर, सीप्झ, अंधेरी एमआयडीसी, मरोळ नाका, विमानतळ टी २, सहारा रोड, विमानतळ टी २, सांताक्रुझ, वांद्रे वसाहत, सांताक्रूझ, बीकेसी, धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर मेट्रो, सिद्धिविनायक मंदिर, वरळी, आचार्य अत्रे चौक, विज्ञान संग्रहालय,महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड.

सेवा वेळ – सकाळी ५.५५ वाजेपासून ते रात्री १०.३० वाजेपर्यंत

दररोज २८० फेर्‍या

  • २८ गाड्या सेवेत, तीन गाड्या राखीव
  • गर्दीच्या वेळेस दर पाच मिनिटांनी धावणार मेट्रो

तिकिट दर

  • १० ते ७० रुपये
  • आरे कफ परेड – ७० रुपये
  • आचार्य अत्रे ते कफ परेड – ४० रुपये
  • आरे ते सिद्धिविनायक – ६० रुपये
  • दादर ते चर्चगेट – ५० रुपये
  • बीकेसी ते कफ परेड – ६० रुपये

सध्याची दैनंदिन प्रवासी संख्या – ७० हजार
अपेक्षित दैनंदिन प्रवासी संख्या – १३ लाख

या मार्गिकांशी जोडणी

  • मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी)मार्गिकेशी आरे मेट्रो स्थानक येथून जोडणी
  • मेट्रो १ (वर्सोवा-घाटकोपर) मार्गिकेशी मरोळ नाका येथे जोडणी
  • मेट्रो ७,७ अ (दहिसर ते गुंदवली, गुंदवली ते विमानतळ)मार्गिकेशी टर्मिनल २ येथून जोडणी
  • मेट्रो २ ब (अंधेरी पश्चिम ते मंडाले) मार्गिकेशी बीकेसी येथून जोडणी
  • मोनोरेल (चेंबूर-जेकब सर्कल) मार्गिकेशी महालक्ष्मी येथून जोडणी
  • चर्चगेट, सीएसएमटी, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाशीही जोडणी

प्रवासाचा कालावधी

  • आरे ते बीकेसी – २० ते २२ मिनिटे
  • बीकेसी ते आचार्य अत्रे चौक – ३५ मिनिटे
  • आचार्य अत्रे चौक ते कफ परेड – २० मिनिटे
  • आरे ते कफ परेड – ५६ मिनिटे