मुंबई : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मूतखड्याचा त्रास झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.

नरहरी झिरवाळ यांच्यावर मागील ८ दिवसांपासून उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. परंतु मूतखड्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा मुंबईतील सेैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाने दिली.