वडाळा-चेंबूर-वडाळा या मोनोरेल मार्गावर आता परतीचे तिकीटही उपलब्ध होणार आहे. ज्या अंतराचे परतीचे तिकीट हवे असेल त्यासाठी दुप्पट रक्कम प्रवाशांना मोजावी लागणार आहे. वडाळा ते चेंबूर अंतरासाठी ११ रुपये इतकी एकेरी तिकिटाची रक्कम असून याच अंतराच्या परतीच्या प्रवासासाठी २२ रुपये मोजावे लागणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी मोनोरेलच्या सर्व स्थानकांवर परतीचे तिकीट मिळणार असून तशा सूचना लावण्यात आल्या आहेत. मोनोरेलच्या सर्व स्थानकांवरील तिकिट घरे पहाटे ५.५० ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत. मोनो रेलमार्गावर परतीचे तिकीट पहिल्यांदाच उपलब्ध होणार असल्याने सर्व स्थानकांवर याबाबत प्रवाशांना माहिती मिळावी, यासाठी अतिरिक्त माहिती सहाय्यक उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2014 रोजी प्रकाशित
मोनो रेलवर आता परतीचेही तिकीट मिळणार
वडाळा-चेंबूर-वडाळा या मोनोरेल मार्गावर आता परतीचे तिकीटही उपलब्ध होणार आहे. ज्या अंतराचे परतीचे तिकीट हवे असेल त्यासाठी दुप्पट रक्कम प्रवाशांना मोजावी लागणार आहे.

First published on: 28-10-2014 at 03:28 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda introduces return tickets for monorail