बांधकामासाठी एमएमआरडीएची निविदा जारी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दहिसरच्या दिशेने जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. टर्मिनल २ आणि पश्चिम द्रुतगती मार्गादरम्यान भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या भुयारी मार्गाच्या कामासाठी मंगळवारी निविदा जारी करण्यात आली. परिणामी, भविष्यात विमानतळावरून झटपट दहिसर गाठणे शक्य होणार आहे.

हेही वाचा >>> आरेतील ‘तो’ बिबट्या लवकरच जेरबंद होणार ; स्थानिकांच्या मागणीनुसार पिंजरे, सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार

पश्चिम द्रुतगती मार्गावरून विमानतळवर झटपट पोहचता यावे यासाठी एमएमआरडीएने एक भुयारी मार्ग बांधला आहे. दरम्यान, आजघडीला विमानतळावरून निघाल्यानंतर दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठा वळसा घालावा लागतो. यात बराच वेळ जातो. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीएने आता आणखी एक भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

हेही वाचा >>> माथेरानमध्ये लवकरच ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू होणार ; दादर, एलटीटी, कल्याणमध्येही सेवा उपलब्ध करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमानतळावरील टर्मिनल २ पासून पश्चिम द्रुतगती मार्गाच्या उत्तरेच्या टोकापर्यंत भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या भुयारी मार्गासाठी यापूर्वी निविदा काढण्यात आली होती. मात्र भुयारी मार्गाच्या भूसंपादनासाठी बराच खर्च येणार असल्याने निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर नवीन आराखडा तयार करून मार्गात बदल करण्यात आला. त्यामुळे आता भूंसपादनाचा खर्च कमी झाल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले. नव्या आराखड्यानुसार हा भुयारी मार्ग बांधण्यात येणार असून बांधकामासाठी मंगळवारी निविदा जारी करण्यात आली. इच्छुकांना डिसेंबरपर्यंत निविदा सादर करता येणार आहे. त्यानंतर निविदा अंतिम करून बांधकामाला सुरूवात करण्यात येणार आहे. काम सुरू झाल्यापासून १८ महिन्यांत भुयारीमार्ग पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.