मुंबई : पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना पी डिमेलो मार्गावरून मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी येथे पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र लवकरच हा प्रवास वेगवान  होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यासाठी पुढाकार घेतला असून पी. डीमेलो मार्ग ते गिरगाव चौपाटी दरम्यान साडेतीन किमी लांबीचा भूमिगत मार्ग तयार निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून बृहत् आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी निविदा मागविण्यात आल्या.

या प्रकल्पामुळे पी डिमेलो मार्ग ते गिरगाव चौपाटी अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता येईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. अंदाजे साडेतीन किमी लांबीचा हा भूमिगत मार्ग असेल.