मुंबई : अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टी, राजकीय, साहित्य आदी विविध क्षेत्रांसह प्रेक्षकांकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतुल परचुरे यांच्या दादरमधील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. यावेळी पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते.

अतुल परचुरे यांच्या निधनानंतर एक अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे. अतुल परचुरे यांना शेवटचा निरोप देताना त्यांचे सहकलाकर भावुक झाले होते.

हे ही वाचा…कोजागिरी! पोर्णिमेच्या रात्री सूपरमून दर्शन, असा आहे दुग्धशर्करा योग.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेते संजय मोने, तुषार दळवी, राजन भिसे, विनय येडेकर, अशोक हांडे, अजित भुरे, अमेय खोपकर, अभिजीत गुरु, अभिनेत्री सुकन्या मोने, समिधा गुरू, क्रांती रेडकर आदी कलाकारांनी अतुल परचुरे यांचे अंत्यदर्शन घेतले. अतुल परचुरे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.