शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “ ज्या प्रकारचे इव्हेंट हिटलर करायचा, त्याचप्रकराचरे इव्हेंट आता मोदी करत आहेत.” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

वसैनिकांच्या सोशल मीडिया सेलचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “ शिवसेनेशिवाय सोशल मीडिया पुढे जाऊ शकत नाही. बाळासाहेब आमचे फेस होते, त्यावेळी सोशल मीडिया कुठे होती? हिटलर सगळ्यांना प्रिय होता, बाळासाहेबांना देखील आवडायचा. आता पंतप्रधानांनाही हिटलर आवडतो. मोदी हिटलरला फॉलो करतात. ज्या प्रकारचे इव्हेन्ट हिटलर करायचा, त्याचप्रकराचरे इव्हेन्ट आता मोदी करत आहेत. मी टीका करत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, “मी रोज सकाळी बोलतो पण माझा नाईलाज आहे. नाहीतर पक्षाचा दिवसभर अजेंडा सेट होणार नाही. आपल्या चेहऱ्यावर तणाव दिसणं हे आपला पहिला पराभव असेल.” असं खासदार संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, “राहुल गांधीना फेल करण्यात जर कोणाचा हात असेल तर भाजपच्या सोशल टीमचा आहे. त्यांनी राहुल गांधीं बद्दल पप्पू पप्पू असं सर्वत्र पसरवलं, तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे मौनी बाबा आहेत असं दर्शवलं. भाजप सर्वात जास्त पैसा आयटी सेलवर खर्च करते. शिवसेनेवर बोलायला तर माणसं ठेवली आहेत.” असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.