मुंबई: पाच टक्के  महागाई भत्तात वाढ, अडीच हजार रुपये दिवाळी भेटची घोषणा एसटी महामंडळाने के ल्यानंतरही त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत एसटीच्या सर्व कामगार संघटनांनी बुधवार, २७ ऑक्टोबरपासून राज्यात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के  महागाई भत्ता मिळावा, वाढीव घरभाडे मिळावे, पंधरा हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा यासह अन्य मागण्या के ल्या असून उपोषणात मोठय़ा संख्येने कामगार वर्ग सामिल होणार असल्याचा दावा के ल्याने एसटीची सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उपोषणात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकच एसटी महामंडळाने काढले आहे.

आर्थिक समस्या व अन्य कारणांमुळे करोनाकाळात एसटीच्या २५ कर्मचाऱ्यांनीही आत्महत्याही के ल्या आहेत. वेतन वेळेवर मिळावे यासाठी कामगार संघटना औद्योगिक न्यायालयात गेल्यानंतर  दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला नियमित वेतन देण्याचे आदेश असताही ते होत नाही. वेतन वेळेवर मिळावे याशिवाय २८ टक्के  महागाई भत्ता देणे यासह अन्य मागण्या नुकत्याच एसटीतील सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने एसटी महामंडळाला दिल्या होत्या. मंगळवारी एसटी महामंडळाने महागाई भत्तात पाच टक्के  वाढ करण्याची घोषणा के ली. त्यामुळे १२ टक्के वरुन हा भत्ता १७ टक्के  पोहोचेल, असे स्पष्ट के ले. तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंदाचे वेतन ७ नोव्हेंबरऐवजी १ नोव्हेंबरला आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 परंतु महागाई भत्तात पाच टक्के  वाढ के ल्याने फक्त ५०० ते ६०० रुपयांची तुटपुंजी वाढ होत असल्याचे मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी सांगितले. शिवाय अन्य भत्तेही दिले नसून काही महत्त्वाच्या मागण्यांवर विचारही झालेला नाही. त्यामुळे बेमुदत उपोषणावर ठाम असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तर महामंडळाने घोषित केलेली दिवाळी भेट आणि महागाई भत्ता हे कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम के लेले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून उपोषणात मोठय़ा संख्येने कामगार सामिल होतील, असे महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.